16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मीर खो-यात नव्या २०० मालमत्तांवर टाच

काश्मीर खो-यात नव्या २०० मालमत्तांवर टाच

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. अशा २०० मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील.

तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले. यात श्रीनगर, अनंतनाग, कुलगाम, शोपियां, पुलवामा, बडगाम आणि बारामुल्लातील कोट्यवधी रुपयांच्या मावमत्तांचा समावेश आहे. यामध्ये खासगी, राज्य आणि सामुदायिक जमीन, व्यावसायिक आणि निवासी परिसरही आहे. बहुतांश संपत्ती प्रतिबंधित संघटना जमात-ए- इस्लामीच्या नावावर आहेत. यामध्ये जमात-ए-इस्लामीच्या फलह-ए-आम ट्रस्टच्या शाळाही आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौ-यात अतिरेकी आणि त्यांना सहानुभूती दाखवणा-यांवर कारवाईचे निर्देश दिले होते. ईडीने ४ नोव्हेंबरला फुटीरतावादी नेता शब्बीर अहमद शाहच्या घरावर जप्ती आणली होती. शब्बीरहा काश्मीर खो-यर्तील दगडफेक, मोर्चा, आंदोलन, बंद, संपासाठी पैसा पुरविण्यात सक्रिय होता. त्याला हिज्ब-उल- मुजाहिदीनकडून हवालाच्या माध्यमातून पैसे पुरविला जात होता.

शोपियांत मालमत्ता जप्त केल्या ईडीने शब्बीर शाहच्या घराची किंमत २१.८० लाख रु. आकारली. मात्र, या मालमत्तेची बाजारभावातील किंमत ३.५ कोटी रु. आहे. राज्य तपास संस्था, एसआयएने जमात-ए-इस्लामीच्या शोपियांत २५.८८ कोटी रुपयांच्या ९ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

अतिरेक्यांचा गोळीबार; दोन मजूर जखमी
अनंतनाग जिल्ह्यातल्या रख-मोमीन भागात अतिरेक्यांनी शनिवारी रात्री परराज्यातील २ मजुरांवर गोळीबार केला. यापैकी एक मजूर बिहार आणि दुसरा नेपाळचा रहिवासी आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. स्थलांतरित मजुरांवर हल्ला होण्याची ही १० दिवसांतील दुसरी घटना आहे. याआधी अतिरेक्यांनी १८ ऑक्टोबरला शोपियां जिल्ह्यात उत्तर प्रदेशच्या २ मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. या वर्षी आतापर्यंत अशा २१ टार्गेट हत्या झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या