18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मीर खो-यात फुटीरवाद्यांचे अटकसत्र

काश्मीर खो-यात फुटीरवाद्यांचे अटकसत्र

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने फुटीरवादी संघटनांचे कंबरडे मोडणे सुरू केले असून फुटीरवाद्यांचा अड्डा झालेल्या हुर्रियत कॉन्फरस नेत्यांचे अटकसत्र सरकारने अवलंबले आहे.

काश्मीर खो-यातली शांतता पूर्वी हुरियतच्या हाकेवर अवलंबून असायची. आता ते इतिहासजमा होण्याचा मार्गावर आले आहे. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने फुटीरवादी गटा विरोधातील कंबर कसली. सरकारने सर्वांत आधी फुटीरवादी नेत्यांची पोलिस सुरक्षा, बुलेटप्रूफ वाहनांचा ताफा काढून घेतला.

त्यानंतर फुटिरवादी नेत्यांचे अटकसत्र हाती घेत शब्बीर शाह, नईम खान, यासीन मलिकसारख्या डझनावर नेत्यांना तुरुंगात डांबले. यासीन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक रसद प्रकरणात जन्मठेप झाली आहे. त्याच्यावर आणखीही दोन खटले सुरू आहेत. आसिया अंडरबीदेखील सध्या तुरुंगात आहे. सरकारच्या या कारवाईचा धसका घेतलेल्या अनेक नेत्यांनी गट सोडून मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. हुरियत संस्थापकांपैकी अब्बास अन्सारीच्या मृत्यूनंतर संघटना खिळखिळी झाली आहे.

आर्थिक स्त्रोत गोठवले
फुटिरवाद्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी सक्त वसुली संचालनालयाने सर्वांत आधी शब्बीरचे २२ लाखांचे घर सील केले. त्यानंतर फुटीरवादी नेता शब्बीर शाहच्या घराचाही इडीने ताबा घेतला. शाहवर दहशतवादी फंडिंगचा आरोप आहे.

गिलानी गटही संपुष्टात
सय्यद शाह गिलानींचा सप्टेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. गिलानीचा जावई अल्ताफ याच्यावर टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली होती. त्याचा दीर्घ आजाराने ऑक्टोबर २०२२ मध्ये रुग्णालयात मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या