29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रकिटने चाचणी केल्यास अ‍ॅपव्दारे कळणार

किटने चाचणी केल्यास अ‍ॅपव्दारे कळणार

एकमत ऑनलाईन

जालना : कोरोनाचा संसर्ग तपासणी करण्यासाठी सध्या मेडिकलमधील कोरोना टेस्ट किटचा वापर वाढला आहे. मात्र ज्यांना कोरोना झाल्याचे कीटमधून आढळून येत आहे, ते रुग्णालयात दाखल होण्याच्या भीतीने पुढे येत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. मिळत आहे. मात्र त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा नेमका आकडा समजण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकार एका अ‍ॅपची निर्मिती करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची सर्वांना भीती वाटत आहे. अशावेळी सध्या मेडिकलमध्ये उपलब्ध असणा-या होम टेस्ट कीटमुळे घरीच कोरोना चाचणी करणा-यांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकट्या मुंबईतच होम टेस्ट कीट वापरणा-यांची संख्या ५ लाखांपेक्षा अधिक आहे. परंतु या किटचा वापर करणा-यांचा अहवाल पुढे येत नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. किटद्वारे चाचणी पॉझिटिव्ह आली की लोक समोर न येता भीतीने घरीच बसल्याने ख-या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कळत नाही. त्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. होम टेस्ट किटने किती जण पॉझिटिव्ह आले आले हे स्पष्ट नाही.

त्यामुळे आता यासाठी एक अ‍ॅप तयार केले असून हे किट विकत घेणा-याला आपला मोबाईल नंबर मेडिकलमध्ये द्यावा लागेल. मेडिकल विक्रेत्याकडून रुग्णांचा नंबर एफडीएकडे जाईल. एफडीएकडून रुग्णाला फोन वरून विचारपूस केली जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या अ‍ॅपमुळे रुग्णाची सध्याची परिस्थिती काय आहे. त्याची ऑक्सिजन लेव्हल काय वगैरे सगळी माहिती जमा होईल. त्यामुळे एखाद्या रुग्णाची तब्येत बिघडली तर अँब्युलन्स, ऑक्सिजनची गरज रुग्णाला असेल तर ती मदत लगेच दिली जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या