मुंबई : १५ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला. २००७ मध्ये राजस्थानात एका कार्यक्रमादरम्यान हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला किस केले होते. यानंतर शिल्पा शेट्टीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याचा आरोप केला होता.
आता वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने शिल्पाची गुन्ह्यातून मुक्तता केली. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर शिल्पा शेट्टीने आपली भूमिका स्पष्ट केली होती. पोलिसांचा अहवाल आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करून दंडाधिका-यांनी आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले.