23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनमी मरेन असे कधीच वाटले नाही

मी मरेन असे कधीच वाटले नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने १९९४ साली ‘आग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिलाच चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर मेजर साब, हम साथ साथ है, कल हो ना हो या चित्रपटांत काम केले. २०१८ साली सोनाली बेंद्रेला कर्करोग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र, तिने हार मानली नाही. सोनाली बेंद्रे हिची एक पोस्ट सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रे हिने या कठीण प्रसंगातून जाताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. सध्या सोनाली बेंद्रे डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, तिने कॅन्सरशी लढा आणि तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या. या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रे म्हणाली की, या आजारामुळे माझा मृत्यू होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. कारण की मी कायम सकारात्मक विचार केला. अमेरिकेत उपचार सुरू असताना मला मित्रमंडळी, नातेवाईक या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. हा आजार झाला असताना आपल्याला मित्रमंडळी, नातेवाईक यांची मोठी गरज असते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या