नवी दिल्ली : भारताचे महान हॉकीपटू आणि १९६४ मधील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंग यांचे निधन झाले. वाढत्या वयोमानामुळे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींमुळे त्यांचे हिमाचल प्रदेश उना येथे निधन झाले.
२२ नोव्हेंबर १९३० रोजी उना जिल्ह्यातील माईरी गावात चरणजीत यांचा जन्म झाला. डेहराडूनच्या कर्नल ब्राऊन केंब्रिज स्कूलमधून त्यांचे शिक्षण झाले. १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या हॉकी संघाचा ते भाग होते. पंजाब युनव्हर्सिटीमधून त्यांचे शिक्षण झाले.
हॉकीमधून निवृत्त झाल्यानंतर चरणजीत सिंग यांनी सिमल्यातील हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून काम केले.