29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्रीयमंत्री नितीन गडकरींना नोटीस

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना नोटीस

एकमत ऑनलाईन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल करून यश मिळविल्याचा आरोप करणारा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश एस सैयद यांनी या प्रकरणी गडकरींना नोटीस बजावली आहे.

अ‍ॅड. सतीष उके यांनी हा अर्ज दाखल केला आहे. यात गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शपथपत्रात गडकरी यांनी आपली संपत्ती, उत्पन्न तसेच वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याचा दावा केला आहे. यामुळे मतदारांची दिशाभूल झाली. याच प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर गडकरीनींच नाना पटोले यांच्यावर पलटवार केला होता.

पटोले यांनी या याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा प्रतिदावा केला होता. तसेच पटोलेंनी केलेले आरोप हे केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर करण्यात आले आहेत. आरोपांबाबत त्यांच्याकडे ज्ञान किंवा सबळ पुरावेही नाहीत, असा युक्तिवाद गडकरींतर्फे करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या