36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवालविरोधात चन्नी दाखल करणार मानहानीचा खटला

केजरीवालविरोधात चन्नी दाखल करणार मानहानीचा खटला

एकमत ऑनलाईन

चंदिगड : ईडीने पंजाबमध्ये काँग्रेस नेत्याच्या पुतण्यासह अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर केजरीवाल यांनी चन्नी यांनी अप्रामाणिक व्यक्ती म्हणून संबोधले होते. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते की, चन्नी हा सामान्य माणूस नसून एक अप्रामाणिक माणूस आहे. केजरीवाल यांना इतरांची प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप करण्याची सवय आहे, असा आरोप चन्नी यांनी केला. याच कारणामुळे त्यांना नंतर भाजप नेते नितीन गडकरी, दिवंगत अरुण जेटली आणि एसएडी नेते बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागावी लागली. चमकौर साहिबमध्ये पत्रकारांशी बोलताना चन्नी म्हणाले की केजरीवाल यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि आप नेत्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांच्या पक्षाला केली आहे.

मी केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मी माझ्या पक्षाला केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मला तसे करण्यास भाग पाडले आहे. ते मला बेईमान म्हणत असून केजरीवालांनी आपल्या ट्विटर हँडलवर तशी पोस्ट टाकली आहे. सीएम चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापे टाकल्यानंतर विरोधी पक्षांनी, विशेषत: आपने चन्नी आणि काँग्रेसवर हल्ला चढविला. तत्पूर्वी, केजरीवाल यांनी दावा केला होता की चन्नी पुढील महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीत चमकौर साहिब मतदारसंघातून पराभूत होतील, तर चन्नी यांच्या पुतण्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त केल्याने लोकांना धक्का बसला आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर चन्नी यांनी उत्तर दिले की, छापेमारीत जप्त केलेल्या नोटांचे बंडल दाखवत माझा फोटो टाकून त्यांनी मला बेईमान म्हणावे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या