26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रकेतकीने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी : सुजात आंबेडकर

केतकीने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी : सुजात आंबेडकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती, अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुजात यांनी केतकीवर टीका करताना शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले आहे.

‘अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती,’’ अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमात सुजात सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर भाष्य केलं. ‘‘सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांना मानसिक आरोग्याचाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंर्त्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा,’’ असं सुजात म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना,‘एखाद्याच्या अंगावर, दिसण्यावर टीका करु नका,’ असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. ‘शरद पवारांबद्दल महाराष्ट्रभरात आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणादायी आहेत. कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात, त्यामुळे त्या नेत्याबद्दल असे बोलणे चुकीचं आहे,’’ असं सुजात म्हणाले. केतकीने शरद पवारांवर टीका करताना त्यांचा चेहरा आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन टीका केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या