22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकेविन पीटरसन भारताच्या प्रेमात

केविन पीटरसन भारताच्या प्रेमात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन हा आजवर अनेकदा भारतात येऊन गेला आहे. मग तो इंग्लंड क्रिकेट टीमचा भारत दौरा असो किंवा मग आयपीएलचे सामने असोत. केविन पीटरसनने भारतात अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. अनेकदा त्याने भारतात येणे आवडत असल्याचेदेखील सांगितले आहे. पण आता पुन्हा एकदा केविन पीटरसनने भारताचे कौतुक करताना भारत सर्वात अद्भुत देश असल्याचे ट्वीट केले आहे. असे करताना केविन पीटरसनने या ट्वीटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले असून, त्यासोबत एएनआयने दिलेल्या एका बातमीचे ट्वीट त्याने पोस्ट केले आहे. भारताने पुन्हा एकदा काळजी करण्याची आपली वृत्ती दाखवून दिली असल्याचे पीटरसन म्हणाला आहे.

दक्षिण अफ्रिकेमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळल्यापासून जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा विषाणू डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये आधीच मूलभूत सोयीसुविधा आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असताना अशा ठिकाणी कोरोनाचा नवा विषाणू आढळणे ही त्या त्या राष्ट्रांसाठी मोठी चिंता वाढवणारी बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफ्रिकेतील ओमायक्रॉन विषाणूने ग्रस्त झालेल्या देशांना मदत देऊ केली आहे. यामध्ये भारतात तयार करण्यात येणा-या कोरोना लसीचे डोस, पीपीई किट, मास्क अशी सर्व मदत भारताकडून करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या