25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रकेसरकर 'विश्वप्रवक्ता' असल्यासारखे वागतायत

केसरकर ‘विश्वप्रवक्ता’ असल्यासारखे वागतायत

एकमत ऑनलाईन

मुंबई:एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत राज्यात नवे सरकार स्थापन करुन काही दिवस उलटत नाही तोच आता ‘माजी शिवसैनिक’ आणि राणे कुटुंबीयांमध्ये तिखट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे पुत्रांमधील वाद सध्या चांगलाच गाजत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.‘केसरकर ‘विश्वप्रवक्ता’ असल्यासारखे वागतायत. राणेंच्या दोन्ही मुलांनी सिंधुदुर्ग आणि कोकणातील दीपक केसरकर यांचं राजकारण संपवलं होतं. २०२४ पर्यंत आम्ही त्यांना गोव्यातच पाठवणार होतो. जेणेकरून कोकणात दीपक केसरकर नावाचा कोणता आमदार होता, हे लोकांच्या लक्षातही राहिलं नसतं. मात्र, आता योगायोगाने त्यांचे राजकारण जिवंत झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता जमिनीवर राहावे, उगाच उडू नये, ’असे निलेश राणे यांनी म्हटले. ते एका मराठी वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना अक्षरश: धारेवर धरले. दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही विचारणार नाही. दीपक केसरकर यांची त्यांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या ताब्यात एकही नगरपालिका किंवा नगरपंचायत नाही. शिंदे साहेबांमुळे त्यांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत.

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्यासोबत आहोत. खरंतर दीपक केसरकर यांना बोलायची गरज नव्हती. तरी त्यांनी स्वत:चा शहाणपणा गाजवायचा प्रयत्न केला. आपण युतीत आहोत. आम्हाला जेवढी तुमची गरज आहे, तेवढीच तुम्हालाही आमची गरज आहे, हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या