22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकेसीआर नितीशकुमार यांना भेटणार

केसीआर नितीशकुमार यांना भेटणार

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : टीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव बुधवारी बिहारच्या दौ-यावर जाणार आहेत. पाटणा येथे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवरदेखील दोन्ही नेते चर्चा करू शकतात.

तेलंगणामध्ये पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर नितीश कुमार यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांच्या एकजुटीबद्दल अनेक वेळा बोलले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केसीआर बुधवारी सकाळी हैदराबाद विमानतळावरून पाटणाकडे रवाना होतील. दोन्ही मुख्यमंत्री दुपारच्या जेवणानंतर राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करतील, असे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या