29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण भारतात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. या महामारीमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर कोरोनामुळे अनेक पालकांचा मृत्यू झाल्याने अनेक लहान मुले आणि विद्यार्थी पोरके झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेण्यात आली. त्यात आता अशा विद्यार्थ्यांसाठी २०२२ म्हणजेच येत्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांत परीक्षा फी माफ असणार आहे. यासंबंधीची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणा-या दहावी आणि बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणा-या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

अनाथ मुलांना केली होती मदत
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो बालके आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते. यासाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या