29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनावरील नव्या औषधाला डब्ल्यूएचओची मान्यता

कोरोनावरील नव्या औषधाला डब्ल्यूएचओची मान्यता

एकमत ऑनलाईन

जीनेव्हा : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला डब्ल्यूएचओने मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून, जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार ओमिक्रॉनचा आता जगभरातील १४९ देशांमध्ये प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने लिलिच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.

कुणाला औषध देता येईल?
ओल्युमियांट या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध कोरोनाची तीव्र लक्षणे असणा-या रुग्णांनाच देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईडसोबतच हे औषध देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

जीएसके-व्हीआयआरच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला
ओल्युमियांटसोबतच जीएसके-वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मात्र, ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक ठरत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित देशांनी या दोन्ही उपचार पद्धतींविषयी निर्णय घ्यायचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या