27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात महाडिकांचा विजयोत्सव

कोल्हापुरात महाडिकांचा विजयोत्सव

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यसभेवर निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांची रविवारी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. राज्यसभेच्या निवडणुकीतील महाडिकांच्या विजयानंतर उत्साही वातावरण असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी व महाडिक समर्थकांनी मिरवणुकीच्या माध्यमातून जणू शक्तीप्रदर्शन केले.

शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक निघाली. खासदार महाडिक यांच्यासह भाजप नेत्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी चौक येथे स्वागतासाठी तब्बल १२०० किलोचा आणि ४० फूट उंचीचा हार, मशिनद्वारे गुलालाची उधळण हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खासदार महाडिक यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी छत्रपती ताराराणी चौक अक्षरश: गुलालाने न्हाऊन निघाला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, डीजेच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते आणि विजयाच्या घोषणा असे जल्लोषी वातावरण चौकाने अनुभवले.

हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. डीजेच्या तालावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. धनंजय महाडिक यांचा खास कोल्हापुरी फेटा घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या खांद्यावर विजयाचा गुलाल टाकून कार्यकर्त्यांनी त्यांनाही खांद्यावर घेतले. कार्यकर्त्यांबरोबर धनंजय महाडिकांनीही डीजेच्या गाण्यावर ताल धरला. ताराराणी चौक, दाभोळकर चौक, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक ते अंबाबाई मंदिर अशी मिरवणूक निघाली. मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या