24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरला पुराचा धोका

कोल्हापूरला पुराचा धोका

एकमत ऑनलाईन

राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार
कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८ वाजता पंचगंगा पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली, तर जिल्ह्यात एकूण ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनही अलर्ट झाली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० टक्के भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे.

पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली. पितापूर गावाजवळून जाणा-या हरणा नदीला पूर आला. स्मशानभूमी नदीपलीकडे असल्याने गळ््यापर्यंत आलेल्या पाण्यातून अंत्ययात्रा काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या