27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयकोविशिल्डचे उत्पादन घटणार

कोविशिल्डचे उत्पादन घटणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन वेरिएंटचा देशात शिरकाव झाल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. एकीकडे च्ािंतेची बाब असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी मंगळवारी मोठी माहिती दिली. कोविड-१९ लस कोविशिल्डचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. केंद्र सरकारकडून लसीची कोणतीही ऑर्डर आली नसल्याने उत्पादनात कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पुनावाला म्हणाले.

पुढील आठवड्यापासून कोविशिल्ड लसीचे उत्पादन किमान ५० टक्क्यांनी कपात होणार आहे. कारण आमच्याकडे सरकारकडून लसीसाठी आणखी कोणतीही ऑर्डर आलेली नाही. देशाला मोठ्या प्रमाणात लसीच्या साठ्याची आवश्यकता असल्यास आपण अतिरिक्त क्षमता ठेवू. पण अशी शक्यता कमीच असल्याचे एका खासगी वाहिनीशी बोलताना पूनावाला यांनी सांगितले.

पुढील सहा महिन्यांत लस पुरवठा करू शकणार नाही, अशा स्थितीत आम्हाला राहायचे नाही. यामुळे स्पुटनिक लाइट लसीचे २० ते ३० दशलक्ष डोस साठवू शकतो आणि याहून अधिक धोका पत्करणार नाहीत, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉनवर लस प्रभावी नाही, असे मानण्याचे कुठलेही कारण नाही. दोन्ही डोस घेतल्यानंतर सुरक्षितता जास्त आहे आणि भारतीय तज्ज्ञांंनीही कोविशिल्ड चांगली असल्याचे म्हटले आहे, असे पुनावाला म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या