36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयकोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस खुल्या बाजारात विक्रीला

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस खुल्या बाजारात विक्रीला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही वाढवा यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या देशातील दोन कोरोना प्रतिबंधक लसींना डीसीजीआयने खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसींच्या निर्मिती कंपन्या सीरम आणि भारत बायोटेकने यासाठी परवानगी मागितली होती.

सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी २५ ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडे कोविशिल्डला खुल्या बाजारात विक्रीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्णमोहन यांनी देखील कोवॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी मिळावी याासाठी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह माहिती सादर केली होती. यानंतर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था यांच्या एक्स्पर्ट पॅनेलने केंद्र सरकारकडं शिफारस केली होती.

तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला परवडण्यायोग्य दरामध्ये लसींना उपलब्ध करून देण्यासाठी लसींच्या दरावर मर्यादा आणण्याच्या दिशेने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

खासगीत सद्यस्थितीत १२०० ते ८०० रुपये दर
दरम्यान, या शिफारशींमध्ये या दोन्ही कोरोना लस सुमारे २७५ रुपये प्रति डोस आणि १५० रुपयांच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह उपलब्ध करुन देण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे सरकारी सुत्रांनी कालच पीटीआयशी बोलताना सांगितले होते. सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्रतिडोस १,२०० रुपये तर सीरमच्या कोविशील्डसाठी ७८० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. या किंमतींमध्ये १५० रुपये सेवा शुल्काचाही समावेश आहे.

नि:शुल्क लसीकरण अभियान सुरुच राहणार
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने प्रौढांसाठी आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड काही नियम व अटींशर्तींसह आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रतिबंधित वापराच्या परवानगीला नव्या सामान्य औषधांमध्ये अपग्रेड करण्यात आले आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. त्याचबरोबर या अटींमध्ये कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्यासह संबंधित लसीचा पुरवठा आणि ६ महिन्यांचा डेटा जमा करणे पुढेही बंधनकारक असणार आहे. तसेच नि:शुल्क लसीकरणाचे सरकारी अभियानही सुरुच राहणार असल्याचे मांडवीय यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या