26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयकोव्हॅक्सिनच्या प्रभावावर लान्सेटमध्ये शंका

कोव्हॅक्सिनच्या प्रभावावर लान्सेटमध्ये शंका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात सर्वप्रथम कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ हैदराबादमधील संपुर्ण स्वदेशी भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीलाही मंजुरी दिली. नुकतीच कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेनेही मंजुरी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यातील अडथळा दूर झाला आहे. मात्र, लान्सेट नियतकालिकामध्ये प्रकाशित अभ्यासातून कोव्हॅक्सिन लस ही फक्त ५० टक्केच प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

लान्सेट जर्नलने अभ्यासासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील एकूण २ हजार ७१४ आरोग्य कर्मचा-यांच्या नमुन्यांची तपासणी केली. या कर्मचा-यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती आणि त्यांनी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. या सर्व कर्मचा-यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले होते. चाचण्यांनंतर कोव्हॅक्सिनचे दोन डोस या कर्मचा-यांवर ५० टक्के प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले. हा अभ्यास प्रामुख्याने देशात कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला. यादरम्यान, आढळणा-या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिएंटने बाधित होताना दिसत होते. या काळात कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचा-यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते. या आरोग्य कर्मचा-यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले होते.

एम्स कर्मचा-यांवर केला अभ्यास
१६ जानेवारीपासून देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरुवात झाली. एम्सने आपल्या २३ हजार कर्मचा-यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले. सदर अभ्यासासाठी निवडलेल्या २ हजार ७१४ कर्मचा-यांपैकी १ हजार ६१७ कर्मचा-यांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या तेव्हा त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यावरुन लान्सेटने कोव्हॅक्सिन ५० टक्केच प्रभावी असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

पहिल्या २० दिवसातील चाचण्या
दरम्यान, फक्त ५० टक्के प्रभावी ठरण्याची काही कारणेही अभ्यासामध्ये दिली आहेत. बहुतांश कर्मचा-यांच्या चाचण्या लस घेतल्याच्या पहिल्या २० दिवसांमध्ये केल्या. तसेच, कोरोना सर्वात गंभीर स्वरुपात असताना हा अभ्यास केला गेला. शिवाय, हा अभ्यास कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या हाय रिस्क अशा रुग्णालयातील कर्मचा-यांवरच करण्यात आला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या