22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकौतुक करण्याऐवजी शिक्षा का?

कौतुक करण्याऐवजी शिक्षा का?

एकमत ऑनलाईन

केपटाऊन : कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने पुन्हा एकदा संपूर्ण जगात भीती निर्माण केली आहे. यानंतर जगभरातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर वेगवेगळे निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणा-या विमानांवर बंदी आणली असून काहींनी क्वारंटाइन होण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान जगभरातून लावण्यात आलेल्या या निर्बंधांमुळे दक्षिण आफ्रिकेने नाराजी जाहीर करत दु:ख व्यक्त केले आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूची ओळख पटवल्याची शिक्षा आम्हाला मिळत असल्याचे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे.

कोरोनाचा नवा विषाणू बी.१.१५२९ याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी करोनाचा विषाणू चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. या नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा हा नवा विषाणू इतरांच्या तुलनेत जास्त संक्रमित असल्याचे सांगितले जात आहे.

परदेशी प्रवाशांसाठी नियमावली
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जे लोक इंग्लंडमध्ये परतत आहेत त्यांना पीसीआर टेस्ट अनिवार्य असून रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहावे लागेल असे सांगितले आहे. जर कोणाला नव्या विषाणूची लागण झाली असेल तर त्याच्या निकटवर्तीयांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ब्रिटनसोबत इतर देशांकडूनही निर्बंध
नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यानंतर युरोपीय महासंघातील देश, ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, इराण, जपान, थायलंड आणि अमेरिकेनेही दक्षिण आफ्रिकी देशांतून होणा-या हवाई वाहतुकीवर बंधने घातली आहेत. बेल्जियम, इस्रायल, जर्मनी, हाँगकाँग आणि ब्रिटनमध्येही ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून जर्मनीत दाखल झालेल्या दोन विमानांतील ६१ प्रवासी बाधित आढळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेने व्यक्त केली नाराजी
जगभरातून निर्बंध लावण्यात येत असल्याने दक्षिण आफ्रिकेने नाराजी व्यक्त केली आहे. वेगाने फैलाव करणा-या या विषाणूची ओळख पटवल्याची शिक्षा आम्हाला दिली जात असल्याचे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य विभागाने जगभरातील नेत्यांना आमच्यावर निर्बंध लावू नयेत असं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या