23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडखंडित विज पुरवठ्यामुळे रोपवाटिकेला पाणी अपुरे

खंडित विज पुरवठ्यामुळे रोपवाटिकेला पाणी अपुरे

एकमत ऑनलाईन

किनवट : बोधडी वनविभाच्या अंतर्गत असलेल्या पार्डी-वैतागवाडी येथिल रोपवाटिकेला अद्यापपर्यंत अवैध विज पुरवठा चालू होता; परंतू आता विज पुरवठा खंडीत केल्यामुळे रोपांचे संगोपन करण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर सावरी येथिल लाकूड विक्री आगारातही कृषी पंपाला पुरवठा होणा-या विद्यूतचा येथे पुरवठा होत असल्याने रात्री देखरेख करण्यासाठी वनकर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदरील आगारात वनविभाग, जंगल कामगार सहकारी संस्था आणि आदिवासी मालकी पट्यातील लाकूड या आगारात संकलन केले जाते. विज वितरण कंपनीला आगाराला स्वतंत्र डी.पी. पुरवठा करण्याला अडचणी येत असल्याचे सांगितले. सद्या कडाक्याचा उन्हाळा असल्यामुळे यदाकदाचित आगीचा प्रसंग ओढावल्यास त्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा सवाल व्यक्त होत आहे.

बोधडी वनविभागाच्या कार्यकक्षेतील पार्डी-बोधडीच्या सिमेवरील वैतागवाडीलगत रोपवाटिका (नर्सरी) अनेक वर्षापासून कार्यान्वित आहे. पाण्यासाठी रितसर कोटेशन आजमितीपर्यंंत भरलेले नसले तरी विजेचा वापर मात्र करण्यात आल्यानेच रोपे तयार करण्यात आली. परवा विज वितरण कंपनिच्या कर्मर्चा­यांनी विज पुरवठा होणारे वायर गुंडाळून आणल्याने हा प्रकार चर्चेला आला. खातरजमा करण्यासाठी विज वितरण कंपनी आणि वनपालांशी संपर्क साधल्यानंतर दुजोरा मिळाला हे विशेष. पार्डी ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल देऊन पुरवठा चालू होता असे त्यांनी सांगितले. लवकर वैध विज पुरवठा झाला नसेल तर रोपवाटिकेची काय वाट लागेल ? यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली.

सावरी लाकूड आगाराचीही फार वेगळी कहाणी नाही. कोटेशनचाच मुद्दा आणि स्वतंत्र डीपी हा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. कृषी पंपांना पुरवठा होर्णा­या विजपुरवठ्यावर आगाराची बिस्त असल्याचे धक्कादायक वृत्त सांगण्यात आले आहे. मेहनत करणारे कर्मचारी रात्रीअपरात्री अंधारात ड्युटी बजावतात. कडाक्याच्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. ४४ अंशांवर तापमान तापतेय. उकाड्यातून घर्षन होऊन आगीसारखा दुर्दैवी प्रसंग ओढावलाच तर जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून विज आणि वन प्रशासनाने सामंजस्यातून तात्काळ वैध विज पुरवठा केल्यास हितावह ठरेल अशा लोकापेक्षा वाढीस लागल्या आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांच्याशी भ्रमनध्वनीवरुन संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नसल्याने पूर्ण माहिती मिळू शकली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या