24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीखत दरवाढीस केंद्र सरकार जबाबदार : कृषीमंत्री दादा भुसे

खत दरवाढीस केंद्र सरकार जबाबदार : कृषीमंत्री दादा भुसे

एकमत ऑनलाईन

परभणी : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांची दरवाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कृषीमंत्री दादा भुसे यांनी परभणीत बोलताना केला.
कृषीमंत्री दादाजी भुसे २ दिवसांच्या परभणी जिल्हा दौ-यावर आले आहेत. गुरूवार, दि. २१ एप्रिल रोजी लातूर विभागीय कृषी विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भुसे म्हणाले की, केंद्राकडे खत दरवाढी संदर्भात नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. खताची दरवाढ करण्याचा अधिकार केंद्राचा आहे. त्यामुळे ही दरवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्र्यांसह केंद्राकडे आम्ही मागणी केली आहे. त्याच बरोबर राज्यात खताची टंचाई भासू नये, यासाठी पुरेसा खताचा पुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. खताची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारने या दरवाढीवर नियंत्रण ठेवावे, असे कृषिमंत्री म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या