23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रखातेवाटपावर शिंदे गटाचे ५ मंत्री नाराज?

खातेवाटपावर शिंदे गटाचे ५ मंत्री नाराज?

एकमत ऑनलाईन

गुलाबराव पाटील भुमरे, भुसे, केसरकर, राठोड यांचे फोन स्वीच ऑफ!
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातील ५ मंत्री नाराज झाले आहेत. यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे यांचा समावेश आहे. दादा भुसे यांच्याकडे या अगोदर कृषी खाते होते. मात्र, आता त्यापेक्षा दुय्यम खाते असल्याने त्यांनी फोन स्विच ऑफ केल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. आता खातेवाटपावरून शिंदे गटातील ५ मंत्री नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या खातेवाटपानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवली..शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल, असे ट्विट करत सरकारवर टीका केली.

भाजपविरोधात रोष वाढू शकतो
महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नाही, आमची कुचंबणा होत आहे, असा थेट आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादी आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होत होता. एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड करून भाजपच्या साथीत मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र, खातेवाटपात पूर्णत: देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला राहिला. त्यामुळे जी ओरड अजित पवारांविरोधात झाली, तीच ओरड आता शिंदे गटातील मंत्र्यांकडून जाहीरपणे नाही झाली, तरी अंतर्गत नक्की होतील, अशीच स्पष्ट चिन्हे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या