26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयखाद्यतेल प्रतिलिटर २० रुपयांनी स्वस्त?

खाद्यतेल प्रतिलिटर २० रुपयांनी स्वस्त?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेली दोन वर्ष सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या ५० ते ९० टक्क्यांनी वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. मात्र भारत सरकारने निर्यात शुल्क पूर्णपणे तर कृषीसेसदेखील माफ केला आहे. यानंतर जागतिक समिकरणे बदलत असल्याने खाद्यतेलाच्या किमती पंधरवड्यापासून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भारत सरकारच्या अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने बुधवारी देशभरातील खाद्यतेलाच्या व्यापा-यांशी संबंधित बैठकीत कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे हे दर प्रतिलिटर किमान २० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार खाद्यतेलाच्या बाबतीत आता अ‍ॅक्शन मोडवर आले असून याकरिता ही बैठक बोलावली गेली. यात खाद्यतेल कंपन्यांनी खाद्यतेलाच्या अधिकतम विक्री किंमत (एमआरपी) मध्ये बदल करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार आगामी काळात दरात आणखी कपात केली जाऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत किंमत २० रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा अंदाज आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियाने पामतेलावरील निर्यातबंदी उठविल्यानंतर आणि देशात मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने यावर्षी तेलबियांचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यातून खाद्यतेलाचे दर पंधरा दिवसांपूर्वी स्वस्त झाले होते, त्यात आणखी दर कमी होऊन नवा दिलासा सामान्यांना मिळू शकणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या