28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रखासगी बस-कारच्या धडकेत ३ ठार

खासगी बस-कारच्या धडकेत ३ ठार

एकमत ऑनलाईन

मेहकर : खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने तिघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी नागपूर – मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ घडली. इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४), विशाल विसपुते (३४) अशी मृतकांची नावे आहेत.

चाळीसगाव येथील पाचजण कार क्रमांक (एमएच ०६, डब्ल्यू ५१३४)ने आर्णी येथे जात होते. दि. २३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता नागपूर-मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ खासगी बस क्रमांक (एमएच ४०, बीएल ७०६१) व कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये इंदल चव्हाण, योगेश विसपुते, विशाल विसपुते हे जागीच ठार झाले तर चालक ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण व मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या