24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रखासदार राणांनी बनविले पुरणाचे मोदक

खासदार राणांनी बनविले पुरणाचे मोदक

एकमत ऑनलाईन

अमरावती : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या घरी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. राणा दाम्पत्याच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. खासदार नवनीत राणा यांनी बाप्पासाठी मोदक बनविले. सासूबाईंनी मला मोदक बनवायला शिकविले, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

नवनीत राणा म्हणाल्या, कोविड पॉझिटिव्ह असताना पहिल्यांदा मोदक बनविले होते. मोदक बनविण्याचे व्हीडीओ टाकल्यानंतर तुमच्या हातचे मोदक कोण खाणार, असे नेटकरी म्हणत होते. कारण तेव्हा मी कोविड पॉझिटिव्ह होते. मुंबईत असताना बाप्पाला मोदक बनवून भोग लावला होता.

मुली आणि सुनांना खूप काही सांगायची गरज नसते. त्या पाहत पाहत शिकतात, अशी आपली संस्कृती आहे. मुंबईत माहेरी असताना फक्त खात होती. पण, सासुरवाडीत आल्यानंतर सासू करते. मग आपणही काही वस्तू बनवाव्यात म्हणून ते शिकले. बाप्पाला स्वत:च्या हाताने मोदक बनवून भोग चढविला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

खासदार अनिल बोंडे यांच्याकडेही बाप्पाचे आगमन
दुसरीकडे खासदार अनिल बोंडे यांच्याकडेही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणपत्ती बाप्पा मोरयाचा गजर करत अनिल बोंडे यांनी गणपती बाप्पाला घरी विराजमान केले. अमृतमहोत्सवी तिरंग्याचा देखावा त्यांनी घरी निर्माण केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या