22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रखा. राणाच्या तक्रारीची लोकसभा अध्यक्षांनी घेतली दखल

खा. राणाच्या तक्रारीची लोकसभा अध्यक्षांनी घेतली दखल

एकमत ऑनलाईन

मुंबई: मुंबई पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा करत खासदार नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत २४ तासांत अहवाल देण्यात यावा, असे लोकसभा सचिवालयाकडून राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणारच, असा निर्धार करून नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे मुंबईत दाखल झाले असता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी त्यांना खार पोलिसांनी अटक केली. त्याच रात्री पोलीस स्टेशनमध्ये मला अपमानास्पद वागणूक दिली गेली, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. राणा यांनी लोकसभाध्यक्षांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ९ मुद्दे नमूद केले आहेत. त्यात खार पोलीस स्टेशनमधील घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे.

मी मागासवर्गीय असल्यानेच मला ड्युटीवरील पोलिसांनी जातीवरून हिणवले. तिथे रात्रभर मला पिण्यासाठी पाणी दिले गेले नाही. पोलीस स्टेशनमधील बाथरूम वापरू दिले नाही, असा दावा राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही पत्रात आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून मुंबई पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता आमच्या घरात घुसून मला आणि माझ्या पतीला बेकायदा अटक केली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, याचे भानही पोलिसांनी बाळगले नाही, असे राणा यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंर्त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्यामागे आमचा हेतु प्रामाणिक होता. आम्ही त्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित केले होते. शिवसेनेला ंिहदुत्वाचे स्मरण करून देण्यासाठी आम्ही तिथे जाणार होतो. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घेऊन आम्ही तेथील हनुमान चालीसा पठण रद्द केले. मात्र, त्यानंतरही चुकीच्या पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली, असे नवनीत राणा यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या