23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रखा. संजय राऊत यांची तब्बल १० तास चौकशी

खा. संजय राऊत यांची तब्बल १० तास चौकशी

एकमत ऑनलाईन

ईडीला सर्व माहिती दिली
मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १० तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री १० वाजता ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ईडी ही रेप्युटेड संस्था आहे. त्यांच्या मनात शंका असेल, त्यांच्याकडे काही माहिती होती, मी पूर्णपणे सहकार्य करत माहिती दिली. यापुढेही गरज पडली तर मी पुन्हा माहिती देईन, असे सांगतानाच राऊत यांनी आमची जाणीवपूर्वक चौकशी लावली जात आहे, असे म्हटले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज ईडी चौकशी करण्यात येणार असल्याने ते सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर झाले होते. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या चौकशीत गैरहजर राहिल्यानंतर ते आज ईडी चौकशीसाठी हजर झाले. त्यानंतर त्यांची तब्बल १० तास चौकशी करण्यात आली.

एकीकडे शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली आहे, तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी केली जात आहे. संजय राऊत यांना २८ जून रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यानंतर त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यावेळी त्यांना १४ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर ते आज ईडी कार्यालयात हजर झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या