26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रखा. संभाजीराजेंचा लॉंग मार्चचा इशारा

खा. संभाजीराजेंचा लॉंग मार्चचा इशारा

एकमत ऑनलाईन

पुणे : मराठा आरक्षणाबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा सरकारला वेळ दिला असून त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्यास पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा दिला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला काहीच हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले की, आरक्षणाचा विषय हा लगेच होणारा नाही. त्याला सहा महिने किंवा वर्ष लागेल. राज्य सरकारची जबाबदारी आहे की मागासवर्गीय आयोग स्थापन करून किंबहुना आयोग स्थापन करता येत नसेल, तर अगोदर कमिटी स्थापन करावी.खासदार संभाजीराजे पुढे म्हणाले की, तुम्ही स्वत: सामाजिक मागास राहिलेले नाहीत. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिले नियोजन आहे.

पुढे काहीच होत नसेल तर केंद्रात जाऊ शकतो. पाच मूलभूत सुविधा समाजाला देऊ शकता. हीच मागणी मी केलेली आहे. यावर काही निर्णय झालेला नाही. यामुळे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरवलेले आहे. परत मी थोडा वेळ देत आहे. जर यातदेखील काही निर्णय घेतला नाही, तर दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईत लाँग मार्च काढणार, असे खासदार संभाजी राजे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी एसटी कर्मचा-यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आवाहनही केले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या