27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रखोतकर यांच्या बंगल्यावर छापा

खोतकर यांच्या बंगल्यावर छापा

एकमत ऑनलाईन

जालना : ईडीच्या कारवाईचे सत्र आता जालन्यात येऊन पोहोचले आहे. जालन्यात ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात हा छापा टाकण्यात आला. दरम्यान, खोतकर यांच्या भाग्यनंगर येथील बंगल्याचीही झाडाझडती घेतल्याचे समजते. या पथकात १२ जण आहेत.

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदी-विक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत, असा सनसनाटी आरोप केला होता. दोन दिवसांपूर्वीच आरोप झाल्यानंतर लगेचच ईडीने अर्जुन खोतकर यांच्या घरावर छापा टाकला. येथे सकाळी ८.३० च्या सुमारास छापा पडला.

खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरू आहे. तसेच सकाळपासून खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यातही ईडीचे पथक झाडाझडती घेत आहे. आतमधून दरवाजे बंद करून ही झाडाझडती सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नेमकी ही छापेमारी का करण्यात आली, याची माहिती अद्याप मिळू शकली नसली तरी, किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात आरोप करीत सुटले आहेत.

ते जिथे-जिथे दौरा करून नेत्यांवर आरोप करतील, तिथे लगेचच छापेमारी होते. दोन दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ््याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दोन दिवसांत खोतकर यांच्या बंधूंच्या कार्यालयावर छापे टाकले. त्यामुळे जालन्यात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या