26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयख्रिसमस परेडमध्ये गाडी घुसून ५ ठार

ख्रिसमस परेडमध्ये गाडी घुसून ५ ठार

एकमत ऑनलाईन

वौकेशा : अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात शाळकरी मुले आणि सामान्य नागरिकांचा समावेश असलेल्या एका ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास ४० लोक जखमी झालेत. या घटनेचा व्हीडीओदेखील समोर आला. यात एक लाल रंगाची एसयूव्ही कार अचानक गर्दीत येऊन अनेकांना चिरडत जाताना दिसत आहे. त्या गाडीमागे लगेच पोलिसांची गाडी पाठलाग करतानाही पाहायला मिळत आहे.

ही घटना वौकेशा या शहरात रविवारी (२१ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी घडली. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हे दहशतवादी कृत्य वाटत नाही. अन्य एका ठिकाणाहून आरोपी फरार होत असताना त्याने गर्दीतून गाडी घातली.विस्कॉन्सिनमध्ये लहान मुले आणि नागरिक ख्रिसमस परेडचा आनंद घेत होते. यासाठी परेड सुरू असलेल्या भागातील रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या