25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रगँगस्टर पुजारीला उल्हासनगरात अटक

गँगस्टर पुजारीला उल्हासनगरात अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : उल्हासनगर पोलिसांनी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला अटक केली. सुरेश पुजारीने २०१५ ला उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चिदानंद करेरा यांची आपल्या हस्तकांकडून गोळ््या झाडून हत्या केली होती. सच्चिदानंद करेरा यांच्या हत्येप्रकरणी पुजारी वॉन्टेड होता.

शिवाय त्याच्यासह इतर १२ जणांवर मोक्का लावण्यात आला होता. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत नगरसेवक, राजकीय नेते आणि मोठ्या व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करून त्याने धमकी दिली होती. या सर्व प्रकरणांत अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या पोलिस ठाण्यात पुजारीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या