26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयगंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून

गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याचा ई- मेल मिळाल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे धमकीच्या मेलची पाळेमुळे पाकिस्तानात असल्याचा खुलासा पोलिस तपासणीतून समोर आला आहे.

दिल्ली पोलिसांनी गूगलकडे या मेलसंबंधी माहिती मागितली होती. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई मेल पाकिस्तानातून धाडण्यात आला आहे. हा मेल ज्या सिस्टममधून धाडला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानातील आहे. दरम्यान गौतम गंभीर यांच्यासोबतच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या नावे धमकीचे ई मेल धाडण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांचे लक्ष असून ते याबाबतीत अधिक तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांशिवाय इतर सुरक्षा यंत्रणाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या