19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयगंभीर रुग्णांना बुस्टर डोस?

गंभीर रुग्णांना बुस्टर डोस?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सरकार गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी लसीच्या अतिरिक्त डोसबाबत नवीन धोरण आणणार आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट हे धोरण २ आठवड्यांत तयार करेल. तसेच देशातील ४४ कोटी बालकांच्या लसीकरणासाठी नवीन धोरण आणणार आहे, असेही सांगण्यात आले.

देशातील अनेक प्रयोगशाळा सध्या नवीन प्रकारावर भारतात उपस्थित असलेल्या लसीचा प्रभाव तपासत आहेत. यास २ आठवडे लागू शकतात. त्यानंतरच कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि इतर लसी नवीन विषाणूशी लढण्यास कितपत सक्षम आहेत, हे कळेल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर अनेक देशांमध्ये वृद्धांना बुस्टर डोस दिला जात आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचा समावेश आहे. बूस्टर म्हणजे आपल्याला आणखी ९४ कोटी डोसची आवश्यकता असेल. हे एका रात्रीत तयार होऊ शकत नाहीत. मात्र, देशात लसीची कमतरता नाही, असेही ते म्हणाले.

देशात १५ कोटी लोकांना
अद्याप एकही डोस नाही
देशातील १२ ते १५ कोटी लोकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. ३० कोटी लोकांना दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे आपल्याला लसीकरणाची गती वाढवावी लागणार आहे, असेही डॉ. अरोरा म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या