22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रगणेश मंडपांना परवानगीसाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

गणेश मंडपांना परवानगीसाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपांना परवानगी देण्याची अंतिम मुदत मंगळवार, २३ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, विविध गणेशभक्त व मंडळांनी त्यास मुदतवाढ देण्याची विनंती केल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडप परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ- २) तथा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली आहे.

१९४७ सार्वजनिक मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी
कोरोना काळाच्या दोन वर्षांनंतर यंदा पुन्हा मुंबईत उत्साहात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे, दरम्यान यंदा महानगरपालिकेकडे रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी २७३२ अर्ज आले आहेत तर यापैकी १९४७ मंडळांना परवानगी देण्यात आली असून ४१५ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या