27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयगलिच्छ, खोट्या गोष्टींमुळे मी घाबरणारी नाही : महिला आयोग प्रमुखांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

गलिच्छ, खोट्या गोष्टींमुळे मी घाबरणारी नाही : महिला आयोग प्रमुखांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मी केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ बनावट आहे. विनयभंगावरून मी खोटे बोलत आहे, अशी सोशल मिडियावर आगपाखड करणा-या ट्रोलर्सना शनिवारी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी प्रत्युत्तर दिले. अशा गलिच्छ आरोपांमुळे मी खचणारी नाही, माघार घेणारी नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दिल्ली महिला आयोगाच्या मालीवाल यांचा गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने विनयभंग केला.
कारचालकाने मालीवाल यांना १० ते १५ मीटरपर्यंत गाडीसह खेचत नेले. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर नेटक-यांनी यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन’ बनावट होते, अशी टिकेची झोड उठवत त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना मालीवाल यांनी हे आरोपच गलिच्छ आणि खोट असल्याचे सांगितले. ज्यांना वाटते की, गलिच्छ गोष्टी पसरवून ते मला घाबरवतील. त्यांना मी सांगू इच्छिते की, मी माझा जीव मुठीत घेऊन छोट्याशा आयुष्यात अनेक जोखमीची कामे केली आहेत. माझ्यावर अनेक हल्ले झाले पण मी थांबले नाही. प्रत्येक अत्याचारानंतर माझ्यातील आगीची धग आणखी वाढत गेली. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. मी जिवंत असेपर्यंत लढत राहीन, असे आव्हानही त्यांनी दिले.

भाजपाने ही घटना दिल्ली पोलिसांना बदनाम करण्याचा कट होता, असा दावा करीत मालीवाल यांच्या या स्टिंग ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४७ वर्षीय कार चालकाला अटक केली आहे. हरीश चंद्र असे त्याचे नाव आहे. तो मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगत होता. त्याचा जाब विचारायला गेलेल्या मालीवाल यांनी कारच्या खिडकीत हात ठेवला. दरम्यान आरोपीने कारच्या खिडकीची काच वर घेतली आणि वेगाने कार पळवली. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या