कोलकाता : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात बुधवारी एका तरुणाच्या गळ्यात चक्क त्रिशूळ घुसला. त्याला उपचारासाठी ६५ किमी दूर असलेल्या कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत त्याच्या गळ््यात अडकलेला त्रिशूळ बाजूला काढत जीव वाचविला.
भास्कर राम असे गळ््यात त्रिशूळ घुसलेल्या तरुणाचे नाव आहे. भास्करच्या गळ््यात अडकलेला हा ३० से. मी. लांबीचा त्रिशूळ १५० वर्षे जूना आहे.
रामच्या गळ््यात घुसलेला त्रिशूळ मानेच्या उजव्या बाजूने घुसला आणि डाव्या बाजूने बाहेर पडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरही थक्क झाले. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेह-यावर कसलीही अस्वस्थता नव्हती. सुदैवाने त्याचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याच्या मज्जातंतू अथवा धमन्यांना कसलीही इजा झाली नव्हती. त्याच्या चेह-याच्या आतील भागालाही मोठे नुकसान झालेले नाही.