29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजनगायत्री ठरली उत्तम कॅप्टन व टास्क संचालक

गायत्री ठरली उत्तम कॅप्टन व टास्क संचालक

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रत्येक खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहणा-या नवनवीन खेळांमुळे मराठी ‘बिग बॉस मराठी ३’ मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खेळ जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीने प्रयत्न करत असून या सगळ्यात गायत्री दातार अव्वल ठरत आहे. मागील आठवड्यात कॅप्टनपदाची जबाबदारी गायत्रीवर होती. कॅप्टन आणि बिग बॉसकडून दिल्या जाणा-या टास्कची संचालक अशा दुहेरी जबाबदा-या तिने उत्तमरीत्या निभावल्या.

जसजसा बिग बॉसचा खेळ पुढे सरकत आहे, तसा गायत्रीचा उत्तम खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅप्टनपदाची भूमिका तिने चोख निभावली याबद्दल बिग बॉसमधील बाकीच्या खेळाडूंसह सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही तिचे कौतुक केले. याशिवाय प्रेक्षकही तिच्या खेळाचे कौतुक करत आहेत. कॅप्टन असताना तिने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. गायत्रीच्या या उत्तम खेळामुळे तिचे चाहते तिच्यावर भलतेच खुश आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या