24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्रीडागावस्कर नसते तर प्लॉट रद्द केला असता

गावस्कर नसते तर प्लॉट रद्द केला असता

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील बांद्रास्थित म्हाडाच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. कित्येक वर्ष प्लॉट असूनही भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु केली नाही. त्यानंतर तो प्लॉट ताब्यात घेण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दाखवली. पण आता गावस्करांच्या विनंतीनुसार सरकारने तो प्लॉट त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्या प्लॉटवर लवकरात लवकर अकादमी सुरु करावी, अशी इच्छा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खास आठवणही सांगितली आहे.

बांर्द्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड ३१ वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झाले नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही. त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होते. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या