34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रगिझरमुळे नाही तर भांग प्यायल्यामुळे जोडप्याचा मृत्यू!

गिझरमुळे नाही तर भांग प्यायल्यामुळे जोडप्याचा मृत्यू!

एकमत ऑनलाईन

मुंबई : घाटकोपरमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण आले असून दाम्पत्याचा मृत्यू गीझरमुळे नसून भांग पिल्याने झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून पुढील तपास पंतनगर पोलिस करत आहेत.

दरम्यान, धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मित्रांसोबत रंग खेळून आलेले टीना शाह आणि दीपक शाह राहत्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले होते. दुपारी साडेतीन वाजता शाह दाम्पत्य घरापासून दोनशे मीटर अंतरावर छेडानगर जंक्शनवर दिसले होते. मात्र त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्या ठावठिकाण्याविषयी स्पष्टता नाही.

त्यानंतर काल (शुक्रवारी) पोलिस आणि डॉक्टरांनी हे भांग, अल्कोहलसारख्या विषबाधेचे कारण असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. या जोडप्याचे महत्त्वाचे अवयव तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पोटातील रासायनिक पदार्थ, घटनास्थळी सापडलेल्या उलटीच्या खुणा आणि इमारतीच्या कॅमे-यातील फुटेज याचा तपास सुरू आहे. यामधून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दीपक शहा (४४) आणि टीना शहा (३८) हे जोडपे बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले, त्यांच्याभोवती उलट्या आणि गिझरचे पाणी गळत होते.
पोलिसांनी सांगितले की, दोघे घरी पोहोचल्यानंतर लगेचच मरण पावले. एक दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या शरीरावर शॉवरमधून पाण्याचा सतत प्रवाह सुरू होता. २० तासांपर्यंत ते भिजत राहिल्यामुळे त्यांची त्वचा सैल झाली होती.

घटस्फोटानंतर दीपकचे हे दुसरे लग्न होते, असे एका अधिका-याने सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दुसरे लग्न केले होते. त्याला दोन मुले आहेत. माजी पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत दोघांना आलेल्या ४,५०० कॉल्सवरून पोलिस नावांची यादी करत आहेत.

सुरुवातीला पोलिसांनी गिझरमधून गॅस गळतीमुळे हा मृत्यू झाला असावा असे सांगितले होते, परंतु गिझर बंद असल्याचे निष्पन्न झाले, याबाबतची माहिती पंत नगर पोलिस ठाण्यातील अधिका-याने दिली आहे.

गुरुवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दोघांचे मृत्यूचे कोणतेही प्राथमिक कारण दिलेले नाही. कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेद्वारे पुढील विश्लेषणासाठी व्हिसेरा आणि आवश्यक पेशींचे जतन करण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या