29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयगुगलची चौकशी करण्याचा आदेश

गुगलची चौकशी करण्याचा आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्च इंजिन गुगल आपल्या क्षेत्रात एकाधिकारामुळे भारतातही अपलाभ घेत आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या (डीएनपीए) तक्रारीनंतर सकृतदर्शनी प्रतिस्पर्धा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे सीसीआयने मान्य केले.

ऑनलाइन जाहिराती व अ‍ॅप डेव्हलपर्सकडून प्ले स्टोअरच्या नावाखाली मनमानी कमिशन उकळल्याप्रकरणी गुगलची आधीच भारतात चौकशी सुरू आहे. गुगल एकाधिकाराचा दुरुपयोग करून डिजीटल न्यूज पब्लिशर्सवर अयोग्य अटी लादत असल्याचे गुगलने आधीच मान्य केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या