18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeगुगलवर या गोष्टी शोधाल तर याल पोलिसांच्या रडारवर

गुगलवर या गोष्टी शोधाल तर याल पोलिसांच्या रडारवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्मार्ट फोन आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. दैनंदिन जीवनात येणा-या तांत्रिक अडचणींचे उत्तर शोधण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा वापर प्रत्येकजण करतो. पण कधी कधी आपण टाईमपास करण्याच्या नादात नको त्या गोष्टी गुगल सर्च इंजिनवर शोधतो. मात्र अनावधानानाने केलेली हीच चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. गुगलवर या गोष्टींचे उत्तर शोधणे तुम्हाला थेट तुरूंगातही पोहचवू शकते. त्यामुळे काही गोष्टी गुगलवर अजिबात सर्च करू नका.

हे नका शोधू गुगलवर
बॉम्ब कसा बनवायचा: जर तुम्ही टाइमपास म्हणून बॉम्ब कसा बनवला जातो याचा शोध घेत असाल तर आताच थांबा. या प्रकारच्या गुगल सर्चवर सायबर सेलचा वॉच आहे. त्यामुळे सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

चाइल्ड पॉर्न : चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत सरकार कडक कारवाई करत आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न शोधणे, पाहणे किंवा शेअर करणे हा गुन्हा आहे. यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

गर्भपात कसा करायचा : गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्हा आहे. त्यामुळे गुगलवर त्याच्या पद्धती शोधू नका.

फिल्म पायरसी: फिल्म पायरसी हा गुन्हा आहे. जर तुम्ही चित्रपट ऑनलाइन लीक अथवा डाउनलोड केल्यास तुरुंगातही जावे लागू शकते.

खाजगी फोटो आणि व्हिडिओ: कोणाचेही खाजगी फोटो अथवा व्हिडिओ पाहणे, ते शेअर करणे हे कायद्याने गुन्हा ठरते. त्यामुळे चुकूनही गुगलवर याचा प्रसार करू नका. ते महागात पडू शकते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या