22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्रीडागुजरातची फायनलमध्ये धडक

गुजरातची फायनलमध्ये धडक

एकमत ऑनलाईन

कोलकाता : डेव्हिड मिलरच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. मिलरने यावेळी ३८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारली आणि गुजरातला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातचा संघ थेट अंतिम फेरीत दाखल झाला आहे. हार्दिक पांड्याने यावेळी नाबाद ४० धावा करत मिलरला चांगली साथ दिली.

राजस्थानच्या १८९ धावांचा पाठलाग करताना गुजरातला दुस-या चेंडूवर वृद्धिमान साहाच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी दुस-या विकेटसाठी ७२ धावांची दमदार भागीदारी रचली. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात तो ३५ धावा करून बाद झाला. त्यानंतर वेडही आऊट झाला. वेडनेही ३५ धावा केल्या. पण त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांची चांगलीच जोडी जमली आणि त्यांनी संघाचे आव्हान जीवंत ठेवले. त्यानंतर मिलरने विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी गुजरातच्या संघाने सुरुवातीला यशस्वी जैस्वालच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का दिला, त्याला तीन धावाच करता आल्या. पण त्यानंतर मात्र राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन मैदानात उतरला आणि त्याने सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. संजू यावेळी अशी आक्रमक फलंदाजी करत होता की, त्याने सलामीवीर जोस बटलरलाही मागे टाकले होते. संजू आता अर्धशतक झळकावणार असे वाटत होते. पण यावेळी संजूचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. संजूने यावेळी २६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या आणि राजस्थानची धावगती चांगलीच वाढवली.

संजू बाद झाल्यावर मात्र जोसने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जोस स्थिरस्थावर झाला होता. जोसने गुजरातच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यावर मात्र जोसने धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली आणि कमी चेंडूंत जास्त धावा जमवल्या. जोस यावेळी अर्धशतक साकारणार,असे वाटत होते. पण तो धावचीत झाला आणि त्याचे या हंगामातील चौथे शतक हुकले.

जोसने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत ५६ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर दमदार ८९ धावांची खेळी साकारली. जोसच्या या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानला गुजरातपुढे १८९ धावांचे आव्हान ठेवता आले होते. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या