28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातसाठी मोफत वीज, १० लाख नोक-या

गुजरातसाठी मोफत वीज, १० लाख नोक-या

एकमत ऑनलाईन

राहुल गांधी यांची घोषणा, परिवर्तन रॅलीत भाजपवर टीकास्त्र
अहमदाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभेला संबोधित केल्यानंतर आज अहमदाबादमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शेतक-यांंना कर्जमाफी, गॅस सिलेंडर ५०० रुपयांना देणार असल्याच्या घोषणा केल्या. आमचे सरकार आल्यास शेतक-यांना ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. भाजप देशातील बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले. मात्र, शेतक-यांचे कर्ज माफ केलेले तुम्ही ऐकलेय का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये परिवर्तन संकल्प रॅलीला संबोधित करताना गुजरातच्या मतदारांना विविध आश्वासने दिली. गुजरातमध्ये २०२२ च्या अखेरीस किंवा जानेवारी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींनी गुजरातमध्ये १० लाख नोक-या आणि ३ हजार नव्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची उभारणी करण्याची घोषणा केली. मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. गुजरातमध्ये आमचे सरकार आल्यास ३ लाख रुपयांपर्यंतचे शेतक-यांचे कर्ज माफ करु, असे राहुल गांधी म्हणाले.

नितीशकुमार राहुल गांधी भेट
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेतली. आज दुपारी राहुल गांधी आणि नितीशकुमार यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षांना कशा प्रकारे एकत्र आणता येईल, याबाबतदेखील चर्चा झाली. नितीशकुमार यांनी काँग्रेसने बिहार सरकारला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. नितीशुकमार येत्या काही दिवसांत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या