28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeक्रीडागुजरात टायटन्सने लखनौला केले चीत

गुजरात टायटन्सने लखनौला केले चीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने बाजी मारली. दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने गुजरातपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातच्या राहुल तेवतियाने अखेरपर्यंत गुजरातचा किल्ला लढवला आणि त्यांना पाच विकेट्स राखून पहिला विजय मिळवून दिला. राहुलने यावेळी २४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ४० धावा केल्या. लखनौच्या १५९ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. कारण शुभमन गिल, विजय शंकर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर हार्दिक पांड्या ३३ आणि मिलरनेही ३० धावांची भर घातली. मात्र, तेवतिया अखेरपर्यंत लढत लखनौविरोधात ५ गडी राखून विजय मिळविला.

तत्पूर्वी, लखनौची पहिल्याच सामन्यात ४ बाद २९ अशी दयनीय अवस्था झाली होती. कर्णधार लोकेश राहुल, क्विंटन डीकॉक, इव्हिन लुईस, मनीष पांडेसारखे एकामागून एक दिग्गज फलंदाज बाद झाले. पण त्यानंतर लखनौच्या मदतीला धावून आला तो दीपक हुडा. दीपकने यावेळी लखनौच्या संघाला सावरले नाही, तर आपल्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला दमदार मजलही मारून दिली. दीपकला यावेळी आयुष बदोनीने चांगली साथ दिली. दीपक आणि आयुष यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौला गुजरातपुढे १५९ धावांचे दमदार आव्हान ठेवता आले. हुडाने या सामन्यात ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या, तर आयुषने ४१ चेंडूंत ५४ धावा साकारल्या.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला बाद केले. एवढेच नव्हे तर त्याने क्विंटन डीकॉक (७) आणि मनीष पांडे (६) यांना झटपट बाद करत लखनौला एकामागून एक तीन धक्के दिले. तसेच वरुण आरोननेही लखनौच्या इव्हिन लुईसलाही लवकर बाद केले. त्यामुळे लखनौची पहिल्याच सामन्यात ४ बाद २९ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर दीपक हुडा लखनौच्या संघासाठी धावून आला. त्याने ४१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच लखनौच्या संघाला शंभरी गाठता आली. दीपकने यावेळी आयुष बदोनीबरोबर पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे लखनौला १५८ धावांपर्यंत मजल मारता आली होती.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या