18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयगुजरात निवडणूकीसाठी ७० हजार जवानांचा ताफा

गुजरात निवडणूकीसाठी ७० हजार जवानांचा ताफा

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणूकीला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी संपूर्ण राज्याला निवडणूक काळात लष्करी छावणीचे स्वरुप येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष लक्ष दिले जात असून ७०,००० पोलिसांचा फौजफाटा राज्यात तैनात केला जाणार आहे.

दोन वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकासाठी भाजप आणि मोदींसाही ही लिटमस पेपर टेस्ट असणार आहे. निवडणुकीसाठी सेन्ट्रल गुजरात आर्म्ड पोलीस फोर्सच्या ७०० कंपन्या राज्यात तैनात केल्या जाणार आहेत. यामध्ये एकूण ७०,००० सुरक्षा दल जवानांचा समावेश असणार आहे. यात सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या प्रत्येकी १५० कंपन्यांचा समावेश असणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरलाला दोन टप्प्यात होणार आहे. तर ८ डिसेंबर २०२२ ला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत भाजप ९९ जागांसह पहिल्या स्थानावर होता. तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. अपक्षांकडे तीन जागा, भारतीय ट्रायबल पार्टी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता. यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये प्रामुख्याने निवडणूक रंगणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या