27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडागुजरात ८ धावांनी विजयी

गुजरात ८ धावांनी विजयी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल २०२२ मधील आजचा ३५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघात पार पडला. हा सामना अवघ्या ८ धावांनी जिंकत गुजरातने स्पर्धेतील सहावा विजय मिळवत पुन्हा गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. सामन्यात दोन्ही संघानी उत्तम कामगिरी केली. यावेळी आंद्रे रस्सेल याने अप्रतिम अष्टपैलू खेळीचे दर्शन घडवले खरें पण अखेरच्या षटकात तो निर्धारित लक्ष्य गाठू न शकल्याने केकेआरने थोडक्यात सामना गमावला. प्रथम फलंदाजी करणा-या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर २० षटकात १४८ धावाच करु शकला.

सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शक्यतो नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेत असल्याचे दिसून आले आहे. पण गुजरातने काहीसा वेगळा निर्णय घेतला. ज्याचा फायदाही त्यांना झाल्याचे पाहायला मिळाले. गुजरातचे बहुतेक फलंदाज खास कामगिरी करण्यात फेल झाले. पण कर्णधार हार्दिकने अर्धशतक ठोकल्यामुळे गुजरात एक चांगली धावसंख्या उभा करू शकली. सलामीवीर शुभमन ७ धावांवर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हार्दिकने कोलकात्याविरुद्ध आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्याने थेट दुस-या स्थानावर फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर साहा आणि पंड्या यांनी काहीसा डाव सावरला पण २५ धावा करुन साहा बाद झाला. त्यानंतर मधील फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाही. मिलरने २७ धावांची खेळी केल्यामुळे काहीसा डाव सावरला. पण सर्व संघाचा विचार करता कर्णधार पांड्याने सर्वात चांगली कामगिरी केली. त्याने ४९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार ठोकत ६७ धावा केल्या. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी १५७ धावांची गरज होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या