22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसदावर्तेंच्या १२ वर्षाच्या मुलीचा गाडी चालवतानाचा व्हीडीओ व्हायरल

सदावर्तेंच्या १२ वर्षाच्या मुलीचा गाडी चालवतानाचा व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

मुंबई : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या १२ वर्षांच्या मुलीचा हायवेवर गाडी चालवितानाचा व्हीडीओ समोर आला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओच्या आधारावर सदावर्ते दाम्पत्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी नितीन यादव यांनी केली आहे. सदावर्तेंनी आपल्या १२ वर्र्षांच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालविण्यास देवून इतरांचे जीवीतास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन यादव यांनी पोलिस महासंचालक व गृहमंत्र्यांकडे केली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हीडीओत ही मुलगी ठाणे ते दादर दरम्यान कार चालवत असल्याचे सांगितले जाते आहे. सोबत गाडीचा इन्शुरन्स संपला असल्याने वाहन कायदा अधिनियमानुसार शासनाने गाडी जप्त करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे. नितीन यादव हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवासी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या