ठाणे : घर कुणाला विकायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ घरमालकाचा आहे. त्यासाठी सोसायटीच्या ना हरकत परवान्याची (एनओसी) गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. या निर्णयामुळे एखाद्या विशिष्ट जाती, धर्म, समुदायालाच घरे विकण्याच्या सोसायट्यांच्या मनमानीला चाप बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
काही सोसायट्यांमध्ये विशिष्ट जाती, धर्माला किंवा समाजालाच घरे विकली जात असल्याची तक्रार अनेक वेळा समोर आली आहे. त्यातही स्वमालकीचे घर विकण्यासाठी घरमालकाला सोसायटीची एनओसी घ्यावी लागत होती, पण मियाँ-बिबी राजी तो क्या करेगा काझी, अशी टिप्पणी करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घरविक्रीसंदर्भात नवीन निर्णय जाहीर केला आहे.