गेवराई : गावातील यात्रेसाठी कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या २ तरुणाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजापूर या ठिकाणी शनिवारी सकाळी घडली. मोहन नाना आतकरे (१८) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले (१८) दोघे रा. निपाणी जवळका ता. गेवराई जि. बीड) असे बुडून मृत्यू पावलेल्या युवकांची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका याठिकाणी श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर आहे. दरम्यान आज सकाळी गावातील तरुण गोदावरी नदीकाठी असलेल्या राजापूर याठिकाणी कावडीने पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्नान करीत असताना या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.